रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यामध्ये प्रलंबित असलेल्या फेरफार नोंदीवर आक्षेप नोंदविण्यास 21 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
फेरफार नोंदीमध्ये नोटीसा बजावलेल्या नाहीत, संबंधित खातेदार यांचे पत्ते उपलब्ध होत नाहीत अथवा डाक विभागाकडून नोंदणीकृत पोहोचपावती प्राप्त झालेली नाही अशा विनातक्रारी व मुदत पूर्ण झालेल्या फेरफार नोंदींची यादी संबंधित तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, संबंधित मंडळ अधिकारी यांच्या नोटीस बोर्डवर, संबंधित ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर, तहसीलदार कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
प्रसिध्द केलेल्या यादीतील फेरफार नोंदीवर संबंधित पक्षकार यांचा आक्षेप असल्यास तसा आक्षेप संबंधित तलाठी सजा यांचेकडे दि.२१ फेब्रुवारी २०२२ पर्यत नोंदवण्यात यावा. आक्षेप वरील मुदतीत नोंदविला न गेल्यास संबंधितांची कोणत्याही प्रकारचा आक्षेप अगर हरकत नाही, असे गृहित धरून महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २३० नुसार व महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० नुसार वर नमूद केल्यापैकी प्रलंबित असलेल्या फेरफार नोंद प्रकरणी अंतिम निर्णय घेणेत येईल याची नोंद घेण्यात यावी, तहसिलदार शशिकांत जाधव यांनी कळविले आहे.