दापोली पाळंदेत आढळला मुलीचा मृतदेह, परिसरात खळबळ

दापोली : तालुक्यातील पाळंदे येथील समुद्रकिनारी एका मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरामध्ये खळबळ माजली आहे.

पाळंदे येथील रहिवासी अनिल आरेकर हे सकाळी समुद्रावर गेले असता, वाळूमध्ये रुतलेल्या आशवस्थएत त्यांना एक मृतदेह दिसला. त्यांनी तातडीने याबद्दलची माहिती दापोली पोलीसांना कळवली.

दापोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आहे. 17 ते 20 वर्षांच्या मुलीचा हा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

चिपळूणमध्ये काही दिवसांपूर्वी एका मुलीची बेपत्ता म्हणून तक्रार दाखल झाली होती. तीच तर ही मुलगी नाही याची खातरजमा पोलीसांच्या माध्यमातून केली जात आहे.

त्यांनी त्या बेपत्ता असलेल्या मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आहे. त्यांना ओळख पटवण्यासाठी दापोली मध्ये बोलून घेण्यात आलं आहे.

त्या चिपळूण मधील मुलींच्या घरामध्ये शिक्षणावरून किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर ती मुलगी बेपत्ता झाली होती. त्या मुलीनं आत्महत्या केली तर नाहीना, असा संशय पोलीसांना आहे.

चिपळूणचे पोलीस आणि त्या मुलीचे नातेवाईक जोपर्यंत या मुलीची ओळख पटवून देत नाहीत. तोपर्यंत आम्हाला या विषयात काहीही सांगता येणार नाही. प्राथमिक तपासणीमध्ये घातपात दिसत नाहीये.

– विवेक अहिरे, पोलीस निरीक्षक, दापोली पोलीस ठाणे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*