रत्नागिरी जिल्ह्यात अॅब्युलन्सचे दरपत्रक निश्चित

रत्नागिरी:- कोरोना काळात अॅब्युलन्सचे भाडे अव्वाच्या सव्वा आकारले जाऊ नयेत, यासाठी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नव्याने दरपत्रक जाहीर करण्यात आले आहेत. या दरपत्रकापेक्षा जादा भाडे . आकारल्यास त्या बाबत तक्रार दाखल करावी. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती रत्नागिरीचे आरटीओ सुबोध मेडसीकर यांनी दिली. कोरोना काळात अॅब्युलन्सधारकांकडून जादा भाडे घेतले जात असल्याबद्दलच्या काही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाल्या होत्या, मात्र अधिकृतपणे तक्रार कोणी दाखल केली नव्हती. मात्र समाजहिताला – प्राधान्य म्हणून आरटीओ मेडसीकर यांनी.

नव्याने अॅब्युलन्सचे भाडे प्रति किमीप्रमाणे निश्चित केले आहे. जिल्ह्यातील सर्व अॅब्युलन्सधारकांनी याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन मेडसीकर यांनी केले आहे. मारूती व्हॅन भाडेदर ७०० प्रति किमी १४ रूपये, रुग्णवाहिका स्वच्छता रू. ५००, टाटा सुमो व मॅटॅडोरसदृश बांधणी केलेली वाहने ८४० रूपये प्रति किमी १४ रूपये, स्वच्छता ७०० रूपये, वाहनचालक पीपीई कीट ५०० रूपये, टाटा ४०७ / स्वराज्य .माझदा आदीच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहने ९८० रूपये प्रति किमी २० रूपये, स्वच्छता १ हजार, पीपीई किट ५०० रूपये, आयसीयु अथवा वातानुकूलित वाहने ११९० रूपये प्रति किमी २४ रूपये, स्वच्छता १ हजार, पीपीई किट ५०० रूपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.

तक्रारी असल्यास संपर्काचे आवाहन

तक्रारी असल्यास आरटीओ हेल्पलाईन mh08@mahatrascom.in तक्रार नोंदवावी, असे आवाहन आरटीओ यांनी केले आहे. तसेच जिल्हा आपत्कालीन कक्ष ०२३५२ २२६२४८, २२२२३३, जिल्हा परिषद रत्नागिरी ०२३५२-२२१४०३, पोलीस अधीक्षक कार्यालय ०२३५२ – २२२२२२, ८८८८९०५०२२, जिल्हा रुग्णालय – ०२३५२-२२६०६० आदी क्रमांकावर संपर्क साधावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*