
दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित दापोली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–२०२६ उत्साहात पार पडली. तालुक्यातील विविध शाळांमधून तब्बल ८९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला मिळालेला हा प्रतिसाद अभूतपूर्व होता.
ही वक्तृत्व स्पर्धा संघटनेचा पहिलाच वक्तृत्व स्पर्धा होती. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जाणून घ्यावेत, त्यांच्या जीवनावर अधिक वाचन करावे आणि आपले विचार प्रभावीपणे मांडावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:
गट १ (पहिली ते दुसरी):
प्रथम – इशा प्रशांत गुंदेकर (श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, दापोली).
द्वितीय – अलेक्स फिलिप गावित (श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, दापोली).
तृतीय – श्रेया शशिकांत शिर्के (मराठा मंदिर सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली)
गट २ (तिसरी ते चौथी):
प्रथम – शिवानी शामराव जवळगे (सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली)
द्वितीय – आर्या ज्ञानेश्वर शिंदे (आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिर, दापोली)
तृतीय – प्रज्ञा प्रशांत धुमाळ (मराठा मंदिर सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूल, दापोली)
गट ३ (पाचवी ते सातवी):
प्रथम – सार्थक शिवराज रक्षे (ए.जी. हायस्कूल, दापोली)
द्वितीय – काव्या गणेश शेरे (संतोषभाई मेहता इंग्लिश मिडियम स्कूल, दापोली)
तृतीय – गार्गी भरत तुरे (मराठी मंदिर सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली)
गट ४ (आठवी ते दहावी):
प्रथम – काव्या दिलीप धामणे (संतोषभाई मेहता इंग्लिश मिडियम स्कूल, दापोली)
द्वितीय – गौरी विकास माने (वराडकर हायस्कूल, मुरुड)
तृतीय – पूर्वी गजानन पावसे (व्ही.के. जोशी हायस्कूल, करजगाव).
सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभात दशानेमा गुजर युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, मेंटॉर्स श्री. अरुण गांधी, श्री. राहुल साबळे, श्री. आशिष मेहता, श्री. समीर गांधी, श्री. समीर तलाठी, सोहनी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री. अनिल शेठ, संघटनेचे उपाध्यक्ष श्री. निकेत मेहता, कार्याध्यक्ष श्री. ऋषिकेश तलाठी, सचिव श्री. मयुरेश शेठ, खजिनदार श्री. स्वप्निल मेहता, प्रकल्प संचालक प्रा. तेजस मेहता तसेच संघटनेचे पदाधिकारी श्री. साहिल कडके, श्री. सिद्धेश शेठ, श्री. परेश बुटाला व सदस्य सीए ऋषिकेश शेठ, श्री. स्वामी बुटाला, श्री. सार्थक बुटाला, श्री. साहिल बुटाला, श्री. संदेश मेहता, श्री. अमित मेहता उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रायोजक श्री. राहुल राठोड, श्री. राजेश घोसाळकर, सौ. कांचन मपारा, श्री. संकेत मेहता, श्री. प्रितम शिंदे, श्री. सिद्धेश कर्देकर तसेच सोहनी विद्यामंदिरातील श्री. गमरे सर व श्री. केतन बुटाला यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शर्मिला शिंदे मॅडम यांना श्रध्दांजली वाहिली गेली.
परीक्षक म्हणून श्री. कैलास गांधी, श्री. कुणाल मंडलिक, श्री. अजिंक्य मुलुख, श्री. अनिरुद्ध सुतार, श्री. सुनिल कदम, श्री. आदित्य रिसबुड, कु. पार्थ सामल व कु. श्रुती साखळकर यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वितेसाठी प्रकल्प संचालक प्रा. तेजस मेहता, सीए ऋषिकेश शेठ तसेच संघटनेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस मेहता यांनी केले.

Leave a Reply