दापोली -गोवेली येथील जीवन दीप महाविद्यालय येथे नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रॉस कंट्री मॅरेथॉन ऑल इंडिया निवड चाचणी पार पडली.यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील 38 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेत स्पर्धकांनी जीवन दीप महाविद्यालय गोवेली ते टिटवाला व परत महाविद्यालय असे दहा कि.मी. अंतर पार केले त्यामध्ये एस. एस.टी.महाविद्यालयाची व राजे स्पोर्ट्स अकॅडमी दापोलीच्या या विद्यार्थिनीने सलग तीन वेळा आपले स्थान कायम ठेवून विजयात सातत्य ठेऊन स्पर्धा पूर्ण करणारी रत्नागिरी जिल्ह्याची पहिली खेळाडू ठरली आहे. 10 कि.मी. अंतर अवघ्या 42 मिनिट 14 सेकंदात पूर्ण करून द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदक संपादन केले तिची मंगळूर येथे होणाऱ्या ऑल इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा प्रशिक्षक मोहनीश देशमुख सर एस.एस.टी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. संदेश चव्हाण, श्री मदन गायकर सर व इतर प्राध्यापक, आदी मान्यवर उपस्थित होते.