सर्वसामान्यांची असलेली एसटी सध्या अडचणीत आहे. रत्नागिरी विभागातील दापोली आगारातून लॉंग रुट वर सुटत असलेल्या बसेस कधीहि बंद होतील अशी भिती व्यक्त होत आहे. या सगळ्या परिस्थितीकडे परिवहनमंत्री तथा पालकमंत्री अनिल परब यांनी लक्ष घालून सामान्यांची असलेली एसटी सेवा सुस्थितीत आणावी अशी मागणी आता प्रवाशीवर्गाकडून होऊ लागली आहे. दापोली तालुक्यातही एसटी आगाराती तब्बल १६ लालपरि असलेल्या एसटी बसेस व २ शिवशाही बसेस स्पेअर्स पार्ट्स व टायर अभावी बंद स्थितीत असल्याची धक्कादायक माहिती पूढे आली आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गही हैराण झाला असुन दापोली एसटी प्रशासनही परिस्थिती समोर हतबल झाले आहे. रत्नागिरी एसटी विभागीय कार्यलयाकडून पार्ट्स व टायर पुरविण्यात येत असलेल्या कंपनीचे बील थकल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे वृत्त आहे.यामुळे दापोली आगारातून सुटणाऱ्या लांब पल्यांच्या मार्गावर त्याचा परिणाम झाला आहे. जिल्ह्यात दापोली एस.टी.डेपो हा उत्तम अर्निंग असणारा आघाडीचा डेपो म्हणून ओळख आहे. मात्र अनेक एसटी बसेस बंद असल्याने व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करून लांब पल्याच्या बसेसची व्यवस्था करावी लागत अशी व्यथा कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींकडुन व्यक्त करण्यात येत आहे. दापोली आगारातून मुंबई,ठाणे, पुणे,कोल्हापूर, सांगली, पंढरपूर,नाशिक,शिर्डी आदी एकूण जवळपास ३३ लॉंग रूट याआहेत. या सगळ्या रूटवर नियमित स्वरूपात सोडण्यासाठी सद्य स्थितीत सुस्थिती मधील बसेसच उपलब्ध होत नसल्याने दापोली एसटी प्रशासनाची दमछाक होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष दयावे अशी मागणी प्रवाशी वर्ग व एसटी कर्मचाऱ्यांकडुन होऊ लागली आहे.