दापोलीत चिरे टाकण्यावरून शिवीगाळ करीत मारहाण

दापोली- दापोली तालुक्यातील मौजे दापोली येथे चिरे टाकण्यावरून पती व पत्नीला मारहाण करण्यात आली आहे.

दापोली पोलिस स्थानकावरून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील मौजे दापोली येथील काल सोमवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान मौजे दापोली येथील भुवडवाडी येथे राहणारे मोहन गणपत पवार-वय 68 हे आपल्या घराच्या बांधकामासाठी आणलेले चिरे त्यांच्याच जुन्या घराजवळ टाकत असताना तेथे संशयीत यशवंत गणपत पवार व संशयित जयवंत गणपत पवार हे दोघे भावंडे आपलया जुन्या घराजवळ येत तिथे मोहन पवार टाकत असलेल्या चिरे टाकण्यास प्रतिबंध करून शिवीगाळ केली. यावेळी मोहन पवार यांनी यशवंत व गणपत पवार यांना सदरची जागा ही आपलया सर्वांच्या मालकीची आहे असे सांगितलेवर यशवंत पवार यांनी रॉकेलचा कॅन हातात घेउन मोहन पवार व स्वतः ला जाळून घेतो अशा धमक्या दिल्या व त्याचवेळी दुसरा भाउ जयवंत पवार यांनी हातात काठी घेउन मोहन पवार यांचे सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी अंजली पवार यांच्या उजव्या हातावर मारहाण करण्यास सुरूवात केली. तिथे जवळच असलेले मोहन पवार यांनी जयवंत पवार हे काठीने मारहाण करीत असलेली काठी बाजुला फेकुन दिली व जयवंत पवार यांना समजवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी यशवंत पवार यांनी मोहन पवार यांच्या पायाचे पोटरीवर काठीने मारहाण करण्यास सुरूवात केली व अंजली पवार यांचे किडनीवर काठीने मारहाण करून दुखापत केली आहे. यामध्ये मोहन पवार व त्यांचे पत्नी अंजली पवार हया जखमी झाल्या असून दापोली उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेउन सोडण्यात आले आहे. संशयित आरोपी यशवंत गणपत पवार व जयवंत गणपत पवार यांचेवर गुन्हा भा.द.वि.का.क. 324,506,34 गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दापोली पोलिस स्थानकाचे श्री.चव्हाण करीत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*