दापोलीत शिवसेनेच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध

दापोली – जितेंद्र आव्हाड यांनी श्री राम यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल दापोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्यावतीने प्रशासनाला निवेदने देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दापोली तालुका शिवसेनेनं यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दापोलीत निषेध केला. त्यांच्यावर कारवाई बाबत त्यांनी प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार अर्चना बोंबे आणि पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलं.

यावेळी तालुका विधानसभा समन्वयक प्रदीप सुर्वे, मधुकर दळवी, माजी नगसेवक प्रकाश साळवी, नगरसेविका शिवानी खानविलकर, युवासेना शहर अधिकारी स्वप्निल उर्फ बाबू पारकर, निखिल परब, किरण बांद्रे, नदीम मुकादम, शशांक घाग, मंदार केळकर, सुनील रिसबूड आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*