दापोलीतील साईप्रसाद वराडकरची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत बाजी

दापोली वार्ताहर – कोल्हापूर संजय घोडावत सी.बी.एस.ई इंटरनॅशनल स्कूल येथे झालेल्या सी.बी.एस.ई. शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये 800 मीटर धावणे स्पर्धेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणी दापोलीचा साईप्रसाद उत्पल वराडकर याने तृतीय क्रमांक मिळवून कांस्य पदक संपादन केलं.

साईप्रसाद उत्पल वराडकर याचे संपूर्ण दापोली तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.

शाळेचे चेअरमन सुजय मेहता, शाळेच्या मुख्याध्यापिका रितु मेहता यांनी साईप्रसाद उत्पल वराडकर याचे व शाळेचे क्रीडा शिक्षक संदेश चव्हाण यांचे अभिनंदन केले.

साईप्रसाद वराडकर याला क्रीडा शिक्षक संदेश चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्ग यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*