दापोलीत ‘खाद्यसम्राज्ञी’ पाककला स्पर्धेचे आयोजन; महिलांना सहभागाचे आवाहन

दापोली: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दापोलीत ‘अबोली वीक’ अंतर्गत ‘दापोली खाद्यसम्राज्ञी’ या तालुकास्तरीय पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जेसीआय दापोली तर्फे आयोजित ही स्पर्धा पूर्णतः महिलांसाठी असून, स्थानिक महिलांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजता दापोलीतील ‘स्वाद मराठी’ रेस्टॉरंटमध्ये पार पडणार आहे.

स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक गृहोपयोगी आणि स्वयंपाकघरातील उपयुक्त वस्तू देऊन गौरविण्यात येईल.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी नोंदणीसाठी अनिकेत खानविलकर यांच्याशी ७७०९९९७११९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष कुणाल मेहता, सचिव रोशन वेदक, प्रकल्प संचालक महेंद्र खैरे आणि समन्वयक अनिकेत खानविलकर यांनी केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*