दापोली:- भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा यांच्या तर्फे दापोली नगरपंचायत येथे कर्मचाऱ्यांना त्वरित रेनकोट पुरवठा करावा तसेच शहरातील काही प्रश्ना बाबत यासाठी दापोली नगरपंचायत मुख्यधिकारी साहेब यांना दापोली भाजपा च्या वतीने निवेदन देण्यात आले. येत्या २ दिवसात सोमवार पर्यंत कर्मचाऱ्यांना रेनकोट उपलब्ध नाही झाले तर दापोली नगरपंचायत आवारात धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. दापोली शहरातील उनाड गुऱ्हे, पावसाळ्यात जागोजागी येणारे रस्त्यावरचे पाणी, दापोली शहरात कंत्राटदाराने सुरू करून अर्धवट सोडलेली विकासकामे,दापोली शहरातील अतिक्रमण, बाजारपेठ मधील कचरा व्यवस्थापन, क्षमतेपेक्षा जास्त भरून जाणारा ट्रॅक्टर व त्यातून पुन्हा बाहेर पडणारा कचरा, कोकंबा आळी परिसरातील विहिरी चे दूषित पाणी व इतर अश्या अनेक समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात याची चर्चा करण्यात आली.यावेळी नगरसेविका सौ. जया साळवी,भाजपा शहराध्यक्ष संदीप केळकर,भाजपा दापोली कोषाध्यक्ष प्रशांत शेठ, भाजपा महिला शहराध्यक्ष लिना शेठ, युवामोर्चा तालुकाध्यक्ष अजय शिंदे, युवामोर्चा शहराध्यक्ष स्वरूप महाजन,शकील मणियार,कुणाल शिंदे,अमोल टकले अमीर गोलंदाज आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.