अबब! दापोलीत एका दिवसात ८२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह


दापोली : तालुक्यामध्ये एका दिवसात ८२ कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) रूग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षभरातील एका दिवसातील ही उच्चांकी नोंद आहे. ८२ पैकी ६८ आरटीपीसीआर चाचणी केलेले रूग्ण आहेत तर १४ अँटीजन टेस्ट केलेले रूग्ण आहेत. या आकड्यांवरून दापोलीतली परिस्थिती फारच बिकट बनत चालली आहे. (Dapoli corona update)

दापोलीकरांनो आता तरी सावध व्हा, नाही तर परिस्थिती हाता बाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. आज रात्रीपासून कर्फ्यू लागू करण्यात आलं आहे. त्याची कडक अंमलबजावणी करावी लागेल. ती जर केली नाही तर गुजरात सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

हेही वाचा : UP CM Yogi Aditynath corona positive

हेही वाचा : दापोलीत एका दिवसात 6 जणांचा मृत्यू

दापोली उपजिल्हा रूग्णालयामध्ये ऑक्सिजन बेडची संख्या फक्त ३० आहे. सर्वच्या सर्व जागा सध्या फुल आहेत. या ८२ रूग्णांना कुठे दाखल करायचं असा प्रश्न आरोग्य यंत्रणे पुढे उपस्थित झाला आहे. आता आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल.

अनाव्यशक बाहेर फिरणं टाळा. कर्फ्यू आहे तरी कारणं सांगून कृपया बाहेर पडू नका. आरोग्य यंत्रणेने हात टेकले तर मृत्यूचे खच लागतील याची जाणीव प्रत्येकानं ठेवणं गरजेचं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*