मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 15 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. खेड तालुक्यात मौजे खोपी येथे महेश वसंत निकम हे 10 जुन 2021 रोजी घरातून बेपत्ता होत, सदर व्यक्तीचा मृतदेह 13 जुन 2021 रोजी चक्रवती नदी जवळ सापडले. रत्नागिरी तालुक्यात मौजे शिरबाव येथे महेंद्र प्रभाकर खामकर व इतर 4 जण यांच्या शेतात पाऊसाचे पाणी शिरुन शेताचे (नारळ व आंबे व पेरणी केलेले भात क्षेत्र) व बांधा फुटुन अंशत: नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे हरचिरी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने सदर रस्ता बंद, सदर ठिकाणी सां.बा. विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरु आहे. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे करतुडे येथील चंद्रकांत अरविंद लिगांयत यांच्या ताब्यातील गाडी नं.एमएच ०३ बीएच ३३४० ही टेंभे पुल येथे चालवित असताना पाण्याच्या प्रवाहात वाहू गेली. त्यांनी गाडीतून उडी घेवून बाहेर पडले. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे उक्षी येथे दरड कोसळल्याने सदर रस्ता बंद, सदर ठिकाणी सां.बा. विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरु आहे. कोणतीही जिवीत हानी नाही. राजापूर तालुक्यात मोजे धोपेश्वर येथील गणपती मंदीराची पाऊसामुळे संरक्षक भिंत कोसळली. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे गोवह-बुरंवेवाडी या रस्त्यावर पन्हाळेतर्फे राजापूर येथे मोरी पाऊसामुळे खचली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*