दापोली: दापोली शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विनोद जोशी यांची कन्या आणि सोहनी विद्यामंदिरची माजी विद्यार्थिनी कौमुदी विनोद जोशी हिने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल विभागात उत्कृष्ट कामगिरी करत कमिन्स एक्सिलेन्स अवॉर्ड पटकावला आहे.

कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमेन, पुणे येथे सर्व शाखांमधील सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला जातो.

कौमुदीने आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीने आणि समर्पणाने हा सन्मान मिळवला आहे.

तिच्या या यशाबद्दल सोहनी विद्यामंदिरातील शिक्षकवृंद, दापोली एज्युकेशन सोसायटीचा सर्व परिवार, तिचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

यासोबतच तिला पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कौमुदीच्या या यशाने दापोली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिच्या शाळेचा आणि कुटुंबाचा मान उंचावला आहे.