कोरोना नियमांचे उल्लंघन करणे पडले भारी

दापोली नगरपंचायत निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला पण आता कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आलेल्या नादात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करण्यात आलेल्या शिवसेना राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांसह तब्बल दिडशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री उशिरा हे गुन्हे दाखल करण्यात आलेत.
  

महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होऊ नये यासाठी  ‘ब्रेक द चेन’ चे  धोरण अवलंबले आहे.रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी या धोरणाअंतर्गत ५ किंवा त्यापेक्षा जास्तीच्या समुहाला पहाटे ५ ते रात्रौ ११ वाजेपर्यंत फिरण्यासाठी बंदी घातली आहे, असे असताना त्यांच्या आदेशाचा भंग करत दापोलीतील विजयी उमेदवारांसह अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सुहास पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

जिल्ह्यातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून त्यासाठी शासनाने विविध नियम बंधनकारक केले आहेत. जिल्हाधिकायऱ्यानी याबाबत आदेश दिला होता.

१९ जानेवारी रोजी झालेल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक निकालाच्या अनुषंगाने सीआरपीसी १४९ प्रमाणे नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी नगरपंचायत निवडणुकीत उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांना दापोली पोलीस ठाण्यामार्फत नोटीस देण्यात आली होती.


19 जानेवारी रोजी निकालाची प्रक्रिया सुर झाल्यानंतर सुमारे 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यान दापोलीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक खालीद रखांगे, अन्वर रखांगे, संतोष कळकुटके,  मेहबूब तळघरकर, विलास शिगवण शिवसेनेचे नगरसेवक अरिफ मेमन, रविंद्र क्षीरसागर, अजिम चिपळूणकर व अन्य उमेदवार यांनी सुमारे शंभर ते दिडशे कार्यकर्ते जमवून निवडणूक विजयाचा उत्सव साजरा करत घोषणाबाजी केली.

यावेळी दापोलीत प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह ३५ पोलीस कर्मचारी बंदोबस्ता करता तहसीलदार कार्यलाय परिसरात तैनात होते. यादरम्यान पोलीसांकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांच्या कृत्याममुळे कोरोना रोगाचा संसर्ग पसरण्याचा संभव असल्याचे स्वतःला माहित असूनही सामाजिक अंतर न ठेवता विनामास्क जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड करत आहेत.