दापोली : दिव्यांग क्रिकेट असोशिएशन, रत्नागिरी आयोजित सन्मानिय हिराभाई बुटाला विचारमंच व आई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण कृषी विद्यापिठाच्या मैदानावर दिव्यांगाच्या राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे दापोलीत भव्य असे उद्घाटन पार पडले.
यावेळी हिराभाई बुटाला विचारमंचचे प्रतिनिधी अतुल शेठ, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत, प्राथमिक शिक्षक समिती दापोलीचे अध्यक्ष जावेद शेख, सरचिटणीस दिनेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष विनायक वाळंज, जिल्हा प्रतिनिधी मंगेश कडवईकर, ओंकार साळवी, सागर आईनकर आदि उपस्थित होते.
दिव्यांगाना प्रोत्साहन देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे महत्त्वाचे असून प्राथमिक शिक्षक समिती दिव्यांगासाठी राज्यभर विविध उपक्रम राबवून सामाजिक उत्तरदायित्त्व पार पाडत आहे.
या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी योगदान देता आल्याने समाधान असल्याचे प्राथमिक शिक्षक समिती, दापोलीचे अध्यक्ष जावेद शेख यांनी सांगितले.
ही स्पर्धा आयोजित करताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, हिराभाई बुटाला विचारमंच, आई फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/अधिकारी (अ ते ड) संघटना शाखा दापोली इ.चे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
सामाजिक दायित्त्व पार पाडण्यासाठी यांचा सर्वांनी आदर्श घ्यायला हवा असे आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांनी प्रतिपादन केले. रत्नागिरी व सोलापूर या संघातील सामन्याने रत्नागिरी चॅम्पियन चषकाचे उद्घाटन संपन्न झाले.