हज यात्रेवर करोनाचे सावट; हज कमिटी ऑफ इंडियाने रद्द केले सर्व अर्ज

करोनामुळे अनेक धार्मीक कार्यक्रमावर बंदी घालण्यात येत आहेत. करोनामुळे यावर्षीही हज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने करोना साथीमुळे इतर देशांतून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हज यात्रेवर बंदी घातली आहे. यावर्षी फक्त सौदी अरेबिया केवळ ६० हजार स्थानिक लोकांना हज करण्यास परवानगी देणार आहे.

त्यामुळे हज कमिटी ऑफ इंडियाने हज यात्रा २०२१ चे सर्व अर्ज रद्द करण्याची घोषणा केली आहे. यामुळे यंदा मुस्लिम समाजातील लोकं सर्वात पवित्र आणि महत्त्वपूर्ण हज यात्रेवर जाऊ शकणार नाहीत.

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हज कमिटी ऑफ इंडियाने हज २०२१ साठीचे सर्व अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम समाजातील लोकांना आता हजसाठी १ वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*