देशातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. काल 6000 वर असलेली रुग्णसंख्या आज 5000 च्या जवळपास येऊन पोहचली आहे. त्यामुळे देशातून कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचे म्हटले जातेय. आज देशातील कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत किंचिंत घट झाली आहे. मात्र मृतांची संख्या कालच्या तुलनेत आज वाढली आहे. गेल्या 24 तासात देशात 5 हजार 289 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर 289 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोना रुग्णांची हीच संख्या 6 हजार 396 होती, तर 201 जणांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज केसेस कमी झाल्या आहेत. तर दिवसभरात देशात 11 हजार 651 लोक बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 63 हजार 878 इतकी झाली आहे. तर देशात 13 हजार 450 लोक बरे झाले आहेत.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 63 हजार 878 वर पोहचली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 14 हजार 878 इतकी झाली आहे. आतापर्यंत 4 कोटी 23 लाख 67 हजार 70 कोरोनामुक्त झाले आहे. देशातील डेली पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 0.63 टक्के आहे. तर आठवड्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 0.90 टक्के आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 178 कोटी अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 24 लाख 62 हजार 5622 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 178 कोटी 55 लाख 66 हजार 940 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 2 कोटींहून अधिक लोकांना लसीचा अतिरिक्त डोस (2,05,07,232) देण्यात आला आहे.