नवी दिल्ली – देशात करोनाचे संकट कायम आहे. करोनाचे गेल्या 24 तासांत 2 लाख 86 हजार 384 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 573 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यानंतर, देशातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या 22 लाख 2 हजार 472 झाली आहे. करोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 16 टक्क्यांवरून 19.5 टक्के झाला आहे.

गेल्या चोवीस तासांत 14 लाख 62 हजार 261 जणांची करोना चाचणी देशभरात करण्यात आली. आतापर्यंत देशात 72 कोटी 21 लोकांची करोना चाचणी झाली आहे. आजच्या आकडेवारीनुसार देशात 3 लाख 6 हजार 357 जण करोनातून बरे झाले आहेत.

दरम्यान, करोना रुग्णांमध्ये रोज झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात आदी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण मिळत आहेत.