दापोली : कोरोनाचा प्रादूर्भाव आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचला आहे. नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सर्वांना कोरोना होऊ लागला आहे. कोरोनाचे रूग्ण झपाट्यानं बरे होत आहेत ही त्यातील खास बाब. कोकणातील ग्रामीण भागामध्येही कोरोनाचा फैलाव वाढला आहे. सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या एका आमदारांनाही आता कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाय योजना सर्वांनी करणं आवश्यक आहे.
त्या आमदारांच्या संपर्कातील कार्यकर्त्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी असं आवाहन प्रशासनामार्फत करण्याचं काम सुरू आहे. जे जे नजीकच्या काळात त्यांच्या जवळ आले होते त्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. प्रत्येकांनी आपली काळजी घेणं आता काळाची गरज बनली आहे.