भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास बेजबाबदार, काळजी न घेणारे आणि मास्क न घालणारे लोकच जबाबदार आहेत असा इशारा ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिला आहे. भारतातल्या कोरोना रुग्णांची आकडे वारी देत त्यांनी देशातली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं स्पष्ट केलं.

Mask

भारतातील 0.29 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर 1.92 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये तर 2.7 टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आलेला आहे.

Covid

मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 69 टक्के पुरुष आहेत तर 31 टक्के महिला आहेत.

Cov

तर मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 50 टक्के रुग्ण हे 60 वर्षांच्या वरच्या वयोगटाचे आहेत.

देशात कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 17 वर्षांपेक्षा कमी वयाचे 1 टक्के रुग्ण 18-25 एक टक्के रुग्ण, 26-44 वयोगटाचे 11, 45-60 वयोगट 36 तर 60पेक्षा जास्त वयोगटाचे 51 टक्के रुग्ण आहेत.

 

30 जाने: दररोज फक्त 10 चाचण्या होत होत्या. 15 मार्चला हे प्रमाण दररोज 1000 चाचण्या. 15 मे रोजी दररोज 95000 चाचण्या. तर 12 ऑगस्टला 10 लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला गेला.

काही दिवस भारतात अमेरिका आणि इतर सर्व देशांपेक्षा जास्त चाचण्या केल्या गेल्या आहेत अशी माहितीही बलराम भार्गव यांनी दिली.

 

VirusAd