पुणे जिल्ह्यात कोरोना निर्बंध अधिक कडक होणार

पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने आज सायंकाळी 4 वाजता जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक आयोजित केली आहे.

कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर शासनाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध लागू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

सध्या शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी निर्बंध लागू केले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांत अचानक वाढलेली रुग्ण संख्या लक्षात घेता यामध्ये आणखी वाढ करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

तर सध्या शहर आणि ग्रामीण भागात बहुतेक शाळा- महाविद्यालय देखील सुरू आहेत. मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत या संदर्भात निर्णय होऊ शकतो. यामुळेच या बैठकीकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

महापौरांचा इशारा…
हॉटेल विमानतळ, याठिकाणी नियम पाळले जात नाहीत. काही ठिकाणी हलगर्जीपणा होत असल्याने पुणे शहरात निर्बंध कडक करावे लागतील. असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*