रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांचे आकडा पाचशेच्यावर जात आहे. आज बुधवारी (दि. ५) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत ६२७ नवे कोरोनबाधित आढळले. यात रत्नागिरी तालुक्‍यातील सर्वाधिक २०३ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासांत सत्तरा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ६०८ रूग्ण बरे झाले, अशी माहिती बुधवारी (दि. ५) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️रत्नागिरी २०३
▪️दापोली ४३
▪️खेड २५
▪️गुहागर ६६
▪️चिपळूण १४६
▪️संगमेश्वर ६८
▪️मंडणगड ३
▪️राजापूर ४९
▪️लांजा २४
एकूण ६२७