दापोली तालुक्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले. दापोली शहरासह कोरोना आता ग्रामीण भागात शिरकांव केल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील आज २७ गावांमध्ये कोरोनानी शिरकांव केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. दापोली तालुक्यात बुधवारी दापोलीत कोरोनानी उच्चांक मोडला आहे. दिवसभरात तब्बल ९५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. दापोलीकरांनी आता काळजी घेणे अत्यावश्यक बनले आहे. यामध्ये पुढील आरोग्य केंद्रांचा व गावांचा समावेश आहे. तालुक्यात सध्या तब्बल २० कन्टेंनमेंट झोन एक्टिव्ह आहेत यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सदरची माहिती दापोली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष मारकड यांनी दिली आहे.
▪जालगांव-०४
▪गावतळे-०३
▪असोंड-०२
▪शिवनारी-०२
▪पांगारी-०१
▪गिम्हवणे-०७
▪वाघवे-०१
▪म्हाळुंगे-०३
▪दापोली-१५
▪सातेरे तर्फे नातु-०१
▪बोरीवली-०६
▪हर्णे-०१
▪लखडतर-१३
▪वर्णोशी तर्फे पंचनदी-०४
▪उसगांव-०८
▪भाटी-०२
▪पालगड-०१
▪ताडील-०२
▪अडखळ-०१
▪तेरेवायंगणी-०१
▪पाचवली-०१
▪उंबर्ले-०१
▪दाभोळ-०३
▪कुडावळे-०८
▪आवाशी-०१
▪कादिवली-०२
▪पालवणी-०१
![](https://mykokan.in/index.html/wp-content/uploads/2021/04/IMG_20210213_191043-2.jpg)