नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा रोज नवीन विक्रम होत असून गुरुवारी 3,32,730 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 2263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताने रोजच्या कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत आता अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. गुरुवारची कोरोना रुग्णसंख्या ही जगातील कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीचा एक विक्रम आहे. गुरुवारी देशात 1,93,279 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.