रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांचे आकडा पाचशेच्यावर जात आहे. आज मंगळवारी (दि. ११) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत यापूर्वीचे २०१ कोरोना रूग्ण, आजचे ४२१ असे मिळून ६२२ कोरोनबाधित आढळले. यात रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक ३६२ रुग्णांचा समावेश आहे. मंडणगडामध्ये एकही रुग्ण आज आढळला नाही. गेल्या चोवीस तासांत सत्तरा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ४१० रूग्ण बरे झाले, अशी माहिती मंगळवारी (दि. ११) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️रत्नागिरी ३६२
▪️दापोली १२
▪️खेड १४
▪️गुहागर २७
▪️चिपळूण ८९
▪️संगमेश्वर ४६
▪️राजापूर १६
▪️लांजा ५६
एकूण ६२२
