रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यामधूल कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची खोटी माहिती का दिली जात असा सवाल करत माजी खासदार निलेश राणे यांनी सिव्हिल सर्जन डॉ. संघमित्रा फुले यांना आरपोच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. रत्नागिरी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

6 एप्रिल २०२१ रोजी मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या २ जाहीर केली आणि रत्नागिरी नगर परिषदेनं ४ जणांचे अत्यंसंस्कार केले. ही तफावत का? असा सवाल करत निलेश राणेंनी सिव्हिल सर्जन यांच्याकडून उत्तर मागितलं आहे. राज्य सरकारला रत्नागिरीतून खोटी माहिती दिली जात आहे.

दोन जणांचा मृत्यू लपवल्यामुळे डेलीच्या रिपोर्टमध्ये रत्नागिरीचा क्रमांक ११ वर पोहोचला जर ते आकडे रेकॉर्डवर दाखवले असते तर रत्नागिरीचा क्रमांक तिसरा असता अशी माहिती त्यांनी दिली. यामुळेच ही माहिती लपवली असा आम्हाला संशय आहे असंही निलेश राणे यांनी सांगितलं.

तुम्ही मृत्यूचे आडके लपवले. जिल्ह्यातून खरी माहिती दिली नाही तर केंद्रात दिलेली राज्याची माहिती खोटीच ठरते. याचा खुलासा संबंधितांना करावा असंही निलेश राणे म्हणाले.