सिद्धयोग विधी महाविद्यालयामध्ये वकील होऊन बाहेर पडलेल्या पहिल्या बॅचचा दीक्षांत समारंभ सोहळा अतिशय दिमाखात पार पडला. सदर समारंभ मुंबई विद्यापीठाच्या नवीन नियामानुसार पार पडला.
सदर कार्यक्रमाच्यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री ना. योगेश रामदास कदम यांनी आपली बहुमूल्य उपस्थिती दिली.

कार्यक्रमासाठी सुप्रीम कोर्टाच्या अधिवक्ता ॲड. अनिता बाफना व संभाषण व संवाद तज्ञ अभिषेक बोन्द्रे हे देखील उपस्थित होते. तसेच संस्थेचे खजिनदार, काशीराम सकपाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमांगी पोळ तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोन्द्रे इ. मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रम हा दोन सत्रामध्ये आयोजित झाला होता. सकाळच्या सत्र म्हणजे सिध्दयोग विधी कट्टा यात ऍड अनिता बाफना व अभिषेक बोन्द्रे यांचे व्याख्यान झाले आणि दुपारच्या सत्रामध्ये दीक्षांत सोहळा साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रम उत्तम रित्या पार पडण्यासाठी सिध्दयोग महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी या सर्वांनी उत्कृष्ट रित्या नियोजित टीम वर्क केले आणि मेहनत घेतली.