नागरिकांना आरोग्य व संचारबंदी विषयी मार्गदर्शनाकरीता नियंत्रण कक्ष कार्यान्वित


रत्नागिरी दि.06:- राज्यात सध्या कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होत आहे.  राज्य तसेच जिल्हास्तरावर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.  जिल्ह्यात कोरोना विषाणू (कोव्हीड-19) संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश 05 एप्रिल 2021 ते 30 एप्रिल 2021 पर्यंत (फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संचार बंदी) लागू करण्यात आलेली आहे.  जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य विषयक तसेच संचारबंदी विषयक काही अडचण अथवा मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.
आरोग्य विषयक माहितीसाठी संपर्क
जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय, कोव्हीड नियंत्रण कक्ष फोन नं.:-02352-226060
संचारबंदी विषयक माहितीसाठी संपर्क
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी
फोन नं.-02352-226248/ 222233
व्हॉटसअप-7057222233

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*