पुणे : कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफसह पहिल्या फळीतील कोरोना योद्धयांचे योगदान महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. वारजे-माळवाडी येथे नगरसेवक सचिन दोडके यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या 101 बेड क्षमतेच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटर’चे ऑनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.