नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीतकाँग्रेसच्या पराभवावर विचारमंथन करण्यासाठी सोनिया गांधी यांनी रविवारी दुपारी ४ वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. काँग्रेस मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही उपस्थित राहणार आहेत.