कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांची चिपळूण कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी घेतली भेट
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोलो यांची चिपळूण तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी नुकतीच भेट घेतली. यावेळी हातपाटी वाळू व्यावसायिकांच्या विविध प्रश्‍नांसह चिपळूण तालुक्यातीलल विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी चिपळूणचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.

यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह शहराध्यक्ष लियाकत शाह, कोकण खाडी पारंपारिक वाळू व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष व अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, युवक कॉंग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अल्पेश मोरे, युवक कॉंग्रेसचे चिपळूण संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघाचे क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले उपस्थित होते.