जागतिक स्तरावर रशिया-यूक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढले आहेत. त्यामुळे १ मार्च रोजी एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत.सिलेंडरच्या दरात १०५ रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी करण्यात आली आहे. तर ५ राज्यांच्या निवडणुका सुरू असल्यानं घरगुती सिलेंडरच्या दरात ७ मार्चनंतर वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.