आ. योगेश कदम यांच्याहस्ते देगांवमधील शेतकरी बांधवांना हळद रोपांचे वाटप

दापोली:- दापोली विधानसभा मतदारसंघाचे आ. योगेश कदम यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील देगांवमधील शेतकरी बांधवांना हळद रोपांचे वाटप करण्यात आले. आ.योगेश कदम यांनी कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना हळद लागवड बाबत शेतकर्यांमध्ये आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने गावांगावांत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याच्या सूचना केली होती. त्याअनुषंगाने कोकण कृषी विद्यापीठाने शिबीर घेत हळद लागवड लाभार्थींची सूची तयार केली.
दापोली तालुक्यातील देगांवमधील सुमारे ३५ शेतकरी यांनी हळद लागवडबाबत उत्सुकता दाखवली. यांमध्ये श्री. बाळकृष्ण गोपाळ बारे, श्री. अशोक गंगाराम कदम, श्री. मोहन देवजी भागणे, श्री. रामचंद्र गणपत गोलांबडे, श्री. अभिषेक सुर्वे, श्री. किशोर सुर्वे यांसहित उर्वरीत शेतकरी बांधवांचा समावेश आहे. आपली कोकणातील जमीन हळद लागवडीसाठी पोषक असून इथे खऱ्या अर्थाने पिवळे सोने उगवेल आणि त्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार असुन त्याचाच एक भाग म्हणून दापोली, खेड व मंडणगडमध्ये हळद लागवडीसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ५.५० लाख ( ५ लाख ५० हजार ) घेणार आहे.

महाराष्ट्र शासनाकडून राज्यात ४५ % अनुदान निव्वळ ठिबक सिंचनासाठी मिळते. याच आधारे कोकणासाठी विशेष बाब म्हणून ठिबक संचनासाठी ८०% अनुदान मिळावे अशी आग्रही मागणी आ. कदम करणार आहे. दापोली, खेड व मंडणगडमध्ये सुमारे ५ हेक्टर जमिनीमधून हळद लागवडीचे उद्दीष्ट ठेवले असून त्यासाठी शेतकरी बांधवांनी पुढे यावे व आपल्या पारंपारिक शेतीसोबतच नवीन व्यावसायिक शेती करावी असे आवाहन त्यांनी केले.

दापोली मतदारसंघाला व दापोली तालुक्याला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन खाते मिळाले आहे व दापोली तालुक्यामध्येच कोकण कृषी विद्यापीठसुध्दा आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी बांधवाची योग्य सांगड मी कोकण कृषी विद्यापीठासोबत घालून देणार आहे.
तसेच कृषी व पशुसंवर्धन या खात्याशी निगडीत सर्व योजना सर्वसामान्य शेतकर्यांपर्यंत पोहचविणे हे माझे ध्येय असून प्रत्येक महिन्यातला एक दिवस कृषी व पशुसंवर्धनसाठी राखीव ठेवणार असून शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी समजून घेणार आहे असे मनोगत आ.योगेश कदम यांनी व्यक्त केले.

दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्री. संजय सावंत, रत्नागिरी जि. प. कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सौ. रेश्मा झगडे, उपजिल्हाप्रमुख व दापोली तालुका खरेदी विक्री केंद्राचे चेअरमन श्री. सुधिर कालेकर, माजी जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चव्हाण, माजी जि. प. समाजकल्याण समिती सभापती श्री. भगवान घाडगे, असोंड जि. प. गटाचे सदस्य श्री. अनंत करबेले, दापोली शिवसेना तालुकासंघटक श्री. उन्मेष राजे, असोंड पं. समिती गण सदस्या सौ. वृषाली खडपकर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. दिपक कुटे, उपतालुकाप्रमुख श्री. प्रभाकर गोलांबडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य व वाकवली गावचे सरपंच श्री. निलेश शेठ, कोकण कृषी विद्यापीठ शिक्षण व विस्तार विभागप्रमुख डॉ. श्री. प्रमोद सावंत, प्राध्यापक डॉ. श्री. प्रफुल्ल माळी, विभागप्रमुख श्री. मोहन भागणे, शिवसहकार सेना दापोली तालुकासंघटक श्री. विवेक खडपकर, उपविभागप्रमुख श्री. संदिप मांडवकर, श्री. दिनेश जावळे, शिरावणे गावचे सरपंच श्री. सागर रेमजे, श्री. विश्वास खांबे, भडवळे गावचे सरपंच श्री. विजय नाचरे उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*