आता ई पासची गरज लागणार नसल्याचं सरकारनं केलं स्पष्ट

मुंबई: अनलॉकचे टप्पे जाहीर करताना राज्य सरकारनं नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. अपवाद वगळता आंतरजिल्हा प्रवासासाठी आता ई पासची गरज लागणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पण जिथे कोरोना रुग्णसंख्या जास्त आहे अशा भागात ई- पासशिवाय प्रवास करता येणार नाही. हा प्रवासही केवळ अत्यावश्यक कारणासाठीच करता येणार आहे. अनेक दिवसांच्या लाॅकडाऊननंतर राज्य सरकारने अनलाॅकची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या सोमवारपासून राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्यात येणार आहे. त्याकरिता राज्य सरकारने जिल्हानिहाय गट तयार केले आहेत. त्यानुसार, पहिल्या गटात असलेल्या जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णपणे उठण्यात येणार असून रेड झोन वगळता इतर सर्व ठिकाणी जिल्हांतर्गत प्रवासासाठी आता ई-पासची गरज लागणार नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*