चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठात स्वच्छता मोहीम

रत्नागिरी : महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून स्वच्छताही सेवा या उपक्रमांतर्गत चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठात स्वच्छता मोहिम राबण्यात आली.

एक तारीख एक घंडा या उपक्रमांतर्गत माननीय मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी सरांच्या सुचनेनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या स्वच्छता मोहिमेसाठी कार्यालयीन कर्मचारी, सर्व प्रथम आणि द्वितीय वर्षांचे विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उमेदवार यावेळी या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला.

उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर यांनी प्रथम स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून पटवून दिले.

त्यानंतर वेगवेगळे गट तयार करून प्रत्यक्षात स्वच्छता मोहिमेला सुरूवात करण्यात आली

हा कर्याक्रम उपपरिसराचे संचालक डॉ किशोर सुखटणकर यांच्य मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी उपपरिसराचे सहाय्यक कुलचसिव अभिनंदन बोरगावे, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संस्खेने उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*