दापोली : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दापोली तालुक्यात तहसीलदार वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सागरी किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

तालुक्यात केळशी उटंबर परिसरात सागरी किनारा स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. दरवर्षी कंपनीच्या CSR कार्यक्रमातर्गत जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार होणाऱ्या सागरी किनारा स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येते.

यावर्षीही ही मोहीम शुक्रवारी हाती घेण्यात आली होती. यावेळी निवासी नायब तहसीलदार सुरेश खोपकर, राजेंद्र उंडे – तलाठी केळशी, आदित्य हिरेमठ – तलाठी आतगांव, पेटकर – सरपंच केळशी, केदार पतींगे – उपसरपंच केळशी, राजू विद्वान्स, ग्रामपंचायत सदस्य, महेंद्र रेवाळे माजी सरपंच केळशी, चिमण सरपंच उंबरशेत, खान उपसरपंच उंबरशेत, उंबरशेत ग्रा.पं. सदस्य गणेश खांबे, शंकर पाटेकर,जवूर झोंबडकर तंटामुक्ती अध्यक्ष प्रविण निवाते ग्रामपंचायत कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, कोतवाल सुहास रेवाळे, ग्रामसेवक सुनील आग्रे, पोलीस कर्मचारी कदम,वनविभाग, प्राथमिक आरोग्य व कस्टम कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.