रत्नागिरी दि.24:- सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असुन युक्रेन या देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. नागरिकांसाठी पुढीलप्रमाणे हेल्पलाईन्स नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष (गृह विभाग), नवी दिल्ली
फ़ोन-टोल फ्री 1800118797
फोन – 011-23012113/23014105 / 23017905
फॅक्स 011-23088124
ईमेल- situationroom@mea.gov.inजर रत्नागिरी जिल्ह्यातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी सुशांत खांडेकर यांनी कळविले आहे.
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी फ्रोन 02352-226248/ 222233