देशात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. करोना बाधा टाळण्यापासून ते करोना झाल्यानंतर उपचार करेपर्यंत सर्वच स्तरावर उपाययोजना केल्या जात आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील सर्वच राज्यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र करोन झाला की नाही याबाबत कित्येकांना माहिती नसतं. मात्र त्यांच्या माध्यमातून करोनाचा फैलाव होत असतो. यासाठी रॅपिड अँटिजेन आणि अँटिबॉडी चाचणी केली जात आहे. आता सिपला औषध कंपनीने करोनाची चाचणी करण्यासाठी ‘ViraGen’ हे आरटी-पीसीआर किट बाजारात विक्रीसाठी आणलं आहे. आजपासून हे किट उपलब्ध असणार आहे. या किटला आयसीएमआरकडून मान्यता मिळाली आहे.
सिपलाने गेल्या आठवड्यात या किटबाबत माहिती दिली होती. करोनाची चाचणी करण्यासाठी सिपला कंपनीचं हे तिसरं प्रोडक्ट आहे. यापूर्वी अँटिजेन टेस्टिंग किट आणि अँटीबॉडी टेस्टिंग किट बाजारात आणलं आहे. ‘ViraGen’ या किटमुळे करोनाबाबतचं माहिती मिळणार आहे.
‘या किटमुळे लोकांना चाचणी करण्यासाठी येणारी अडचण दूर होणार आहे. तसेच आयसीएमआरच्या स्टँडर्ड ९८.८ टक्क्यांच्या तुलनेत ९८.६ टक्के करोना विषाणूबाबत माहिती देण्यास मदत होत आहे. ही चाचणी मल्टीप्लेक्स पीसीआर तंत्रज्ञानावर आधारित आहे. करोनाची लक्षणं असलेल्या रुग्णांच्या श्वसनमार्गाच्या वरच्या आणि खालच्या भागातील न्यूक्लिक अॅसिड शोधण्यासाठी हे किट तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे रुग्णांना करोनाबाबत माहिती मिळणार आहे’, अंस कंपनीने टेस्टिंग किट लॉन्च केल्यानंतर सांगितलं होतं. करोना रोखण्याच्या लढाईत आणखी एक पाऊल पुढे पडलं आहे. त्यामुळे करोना फैलाव रोखण्यास मदत होणार आहे. तसेच करोना झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचार घेता येणार आहेत.