चिपळूणला पावसाने झोडपले;बाजारपेठेत पाणी मुख्याधिकारी अधिकऱ्यांसह पहाटे फिल्डवर

चिपळूण: अतिवृष्टीचा इशारा दिलेल्या दिवसात पावसाने दिलासा दिला. मात्र, मंगळवारी मध्यरात्रीनंतर पावसाने जोरदार सुरुवात केली. संपूर्ण रात्र पावसाची संततधार सुरू होती. बुधवारी सकाळी पुन्हा पावसाने दणक्यात सुरुवात केली आणि चिपळूण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. दिवसभर सलग पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आणि वाशिष्ठी नदीची पातळी वाढल्याने बाजारपेठेतील व्यापारी धास्तावून गेले. सायंकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला .पहाटे ४ वाजता बाजार पूल आणि भेंडी नाका येथे मुख्याधिकारी श्री. वैभव विधाते, कार्यालय अधीक्षक अनंत मोरे, सचिन शिंदे अन्य कर्मचाऱ्यांसह पाहणी केली, बाजार पुला पलीकडील विसर्जन घाट येथील लोकांना लागतच्या बिल्डिंगमध्ये हलविण्यात आले, तसेच अन्य सभाव्य ठिकाणी पाहणी केली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*