दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि घरडा फाऊंडेशन, लोटे, खेड आणि कामधेनू कृषि विकास प्रतिष्ठान जालगांव, तंटामुक्त व पर्यावरण संतुलित समृध्द ग्रामपंचायत, कात्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने कात्रोळी येथे कळमुंडकर वाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विठठ्ल मंदिराच्या प्रांगणामध्ये अझोला संवर्धनासाठी तलावाची निर्मिती करुन अझोलाचे बीज सोडण्यात आले.

त्यानंतर मंदिरामध्ये विठ्ठल रखुमाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन सरपंच श्रीकांत निवळकर यांनी केले.

कार्यक्रमामध्ये भात पेंढयावर युरिया प्रक्रिया, तसेच गांडुळखत निर्मिती आणि विविध प्रकारच्या चारा पिकांची लागवड या विषयावर प्रात्यक्षिकासहीत मार्गदर्शन करण्यात आले.

तांत्रिक मार्गदर्शनामध्ये कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नरेंद्र प्रसादे यांनी मार्गदर्शन केले तर सर्व प्रात्यक्षिक कृषी सहाय्यक श्री. अजित भुवड यांनी करुन दाखविले.

मनोगतामध्ये घरडा केमिकल्सचे तुषार हळदवणेकर, कात्रोळी विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन संदीप घाग, कृषी महाविद्यालयाचा प्रथम वर्ष विद्यार्थी मिहिर जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन, आभार प्रदर्शन सरपंच श्रीकांत निवळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर यांनी केले.

कार्यक्रमाचा लाभ कात्रोळी, रामपूर, मिरवणे, मालघर, मजरे कोंडर, गोंधळे या गावातील एकूण ७२ पशुपालकांनी घेतला. या गावातील पशुपालकांच्यामार्फत रोजचे २७० लीटरपेक्षा जास्त दूध वाशिष्टी डेअरीला घालण्यात येते.

भविष्यात या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन ते उत्पादन दुप्पट होण्याची शक्यता संदीप घाग यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक, विस्तार शिक्षण डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली डॉ. संतोष वरखडेकर, डॉ. नरेंद्र प्रसादे, अजित भुवड घरडा फाऊंडेशनचे विश्वस्त सथिष वेंगोली, सीएसआर प्रमुख विनायक दळवी, घरडा केमिकल्स लोटेचे प्रमुख आर. एम. कुलकर्णी यांच्या विशेष अर्थसहाय्याने आणि तुषार हळदवणेकर घरडा केमिकल्स यांच्या प्रयत्नाने सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.