करोना लढ्यात कुठलेही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी

करोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि नाही असे ठामपणे सांगतानाच करोना लढ्यात कुठलेही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. करोना नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत. मात्र केंद्रानेही लसीचा जादा पुरवठा करावा, तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन तसेच कृत्रिम श्वसनयंत्रे (व्हेंटिलेटर्स) उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यानी पंतप्रधानांना केली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*