रत्नागिरी : पुणे येथील केमडिस्टच्या संचालकांनी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांची नुकतीच मंत्रालयात त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. भारतीय बनावटीच्या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर निमिर्तीत सध्या केमडिस्ट अग्रेसर आहे. आतापर्यंत त्यांनी ओएनजीसीला 5000 पेक्षा जास्त ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्सचा पुरवठा केला आहे. ही कंपनी चिनी कंपन्यांना टक्कर देण्याचं काम देशात करत आहे.
या वेळी केमडिस्टचे संचालक उद्योजक तुषार वाघ, संचालक डॉ. सुनील ढोले, खडपोली औद्योगिक वसाहतीमधील रेणुका इंडस्ट्रीजचे उद्योजक महेश आंब्रे, युवक राष्ट्रवादीचे नेते ऋतुज डाकवे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली.