इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : ०७ जून रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करणाऱ्या १० जणांवर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील काँग्रेस भवन कार्यालय येथे पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात हे आंदोलन करण्यात आले होते.

आंदोलकांनी आंदोलनाची परवानगी न घेता गैरकायदा जमाव करून निदर्शने करीत नियमांचे उलंघन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानुसार विजय भोसले, दीपक राउत, अशोक जाधव, अश्विनी आगाशे, कपील नागवेकर, रुपाली सावंत, सुस्मिता सुर्वे, तेजश्री गोतम, सचिन मालवणकर, रिजवाना शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*