सीईटी परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाऊ शकते -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

बारावी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाऊ शकते, अशी महत्त्वाची माहिती महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ४०८४ महाविद्यालयीन शिक्षकांच्या पदांपैकी सुमारे १२०० भरती यापूर्वीच झालेल्या आहेत, ज्यांची उच्चाधिकार समितीने शिफारस केली होती, परंतु कोविडमुळे ही प्रक्रिया ठप्प झाली. पण लवकरच ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*