मध्य रेल्वेचा मडगाव-पनवेल स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय

कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना उसळणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मडगाव -पनवेल स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १६ डब्यांची ही स्पेशल १६ जानेवारी रोजी धावणार आहे.

०१५९६/०१५९५ क्रमांकाची मडगाव-पनवेल मडगाव येथून सकाळी ११ वा. सुटून त्याचदिवशी रात्री ९ वा. पनवेलला पोहचेल. परतीच्या प्रवासात रविवारी रात्री १०वा. पनवेलहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३०वा. मडगावला पोहचेल. या गाडीला करमाळी, थिविम, कुडाळ कणकवली, वैभववाडी, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड,माणगाव, रोहा आदी स्थानकांवर थांबे दिले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*