केळशी, दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत केळशी येथे कृषी सप्ताह उत्साहात साजरा केला. शेतकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमात आदिती बेर्डे, साक्षी चव्हाण, दिक्षा चव्हाण, साक्षी धनवटे, हिरल आलीमकर, स्नेहल बेंदगुडे, शर्वरी भोसले, साक्षी आढाव, सानिका डांगे आणि युगा देसाई या विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला.
या कृषी सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना गिरीपुष्पा पाल्याचे शेतीतील महत्त्व समजावून सांगितले. तसेच, कोकण जलकुंड कसे तयार करावे आणि त्याद्वारे पाण्याचे संकलन कसे करावे, याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. 1 जुलै रोजी कृषी दिनानिमित्त जि.प. प्राथमिक केंद्र शाळा केळशी नं. 1 येथील विद्यार्थ्यांसमवेत कृषी दिंडी काढण्यात आली. यानंतरच्या दिवसांत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि विविध पाने व फुले ओळखण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदीप तळदेवकर आणि इतर शिक्षकांनी विद्यार्थिनींना या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाने झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शेतीविषयी आपुलकी आणि जागरूकता निर्माण झाली आहे.
