गुरांचा गोठा फोडून गुरांची चोरी

दापोली :-“दापोली तालुक्यातील मुगीज येथे गोठ्याच्या सिमेंटचा दरवाजा व कुलुप फोडून अज्ञातांनी 2 गुरे पळवल्याची घटना घडली आहे. अश्रफ महम्मद जुवळे (मुगीज) यांच्या गोठयातून एक पाडा व पाडी अशी गुरे चोरण्यात आली. ही घटना 2 ते 3 मार्च दरम्याने घडली. यामध्ये 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत सुरेश बाळू गोरीवले (63. रा. मुगीज, ठोंबरेवाडी, दापोली) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञातावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*