Category: माय जिल्हा

जिल्ह्यातील अकृषिक परवाने देण्यासंबंधीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी सुधारित अधिकार केले जाहीर.

रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्या वाणिज्य, निवासी, औद्योगिक, धार्मिक व शैक्षणिक अकृषिक परवाने व रेखांकन परवानगीच्या अधिकारांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात चालत्या कारने घेतला पेट, कार जळून झाली भस्मसात

शिमगोत्सवा निमित्त मुंबईहून कोकणात अनेक चाकरमानी येत आहेत. आज कोकणात येणाऱ्या कारने कशेडी घाटात पेट घेतला.

दापोलीत मच्छीमारांचे आंदोलन

दापोली, मंडणगड, गुहागर संघर्ष समिती व हर्णै बंदर कमिटी यांच्यावतीने मच्छीमारांच्या प्रमुख मागण्यासाठी पारंपरिक मच्छिमारांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले

दापोली शहरातील उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरणाकरीता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे येणार

२९ मार्चला करण्यात येणार पुतळ्याचे अनावरण

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांची चिपळूण कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी घेतली भेट

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोलो यांची चिपळूण तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी नुकतीच दुपारी भेट घेतली.

राज्य अर्थसंकल्पामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाकरिता भरघोस निधी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

राज्याचा अर्थसंकल्प राज्याला न्याय देणारा असून या अर्थसंकल्पामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासकामांकरिता भरघोस निधी मिळाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.