रशियानेही युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अनेक देशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच रशियावर निर्बंधही लागू केले आहेत. आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी रशियातून कच्चे तेल आयात करण्यास निर्बंध लागू केले आहेत. तेल उद्योगाने रशियाला खूप फायदा होतो. कॅनडा रशियातून कच्चे तेल आणि गॅस आयात करतो. मात्र आता निर्बंध घातल्यावर रशियाला मोठा फटका बसणार आहे असे कॅनडाने स्पष्ट केले आहे.